शिबिराचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येईल
नियमावली
- नाट्य प्रशिक्षण शिबीर ०७ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत उत्कर्ष मंदिर (पश्चिम शाळा), मामलेतदार वाडी, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४ येथे आयोजित करण्यात येईल.
- या कालावधीत, दर शनिवारी व रविवारी, सायंकाळी ५ ते ८ या वेळेत, एकूण २५ सत्रात शिबिर आयोजित करण्यात येईल.
- १५ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस या शिबिरात सहभागी होता येईल.
- कमीत कमी १५ व जास्तीत जास्त २५ शिबिरार्थींना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्वावर शिबिरात प्रवेश देण्यात येईल.
- शिबिरात नाट्य क्षेत्रातील मान्यवर प्रशिक्षक व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात येतील.
- सर्व सहभागी शिबिरार्थीना “प्रयोग मालाड” तर्फे प्रशस्तिपत्रक व स्मृती चिन्ह देण्यात येईल.
- शिबिरात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश शुल्क रु. ६०००/- (रुपये सहा हजार फक्त) असेल.
- प्रवेश शुल्क फक्त धनादेश अथवा ऑनलाईन स्वीकारले जाईल.
- प्रवेश शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी, कृपया अर्जानंतर दिलेला UPI ID / QR CODE स्कॅन करावा. शुल्क भरण्याची क्रिया यशस्वी झाल्यावर त्याचा SCREENSHOT अर्जासोबत upload करावा.
- प्रवेश शुल्क धनादेश द्वारे भरल्यास, त्याचा पूर्ण तपशील (उदा. धनादेश तारीख व क्रमांक, बँकेचे नाव व शाखेचे नाव इ.) अर्जासोबत online पाठवावा.
- प्रवेश शुल्क रोखीने स्वीकारले जाणार नाही.
- प्रवेश शुल्क प्रवेश अर्जासमावेत दिनांक २५ मार्च, २०२४ पर्यंत आमच्या वेबसाइटवर (www.prayogmalad.org) पाठवणे आवश्यक आहे.
- एकदा स्वीकारलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत करण्यात येणार नाही.
- शिबिरार्थीना संस्थेतर्फे लेखन साहित्य देण्यात येईल.
- वरील नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील.