Prayog Malad

रामकृष्ण गाडगीळ समर्पित

प्रायोगिक नाट्य-पर्व

सन १९७८ मध्ये स्थापन झालेल्या प्रयोग मालाड संस्थेने गेली ४६ वर्षे ज्ञान, सेवा, क्रीडा आणि कला ही उद्दिष्टे समोर ठेऊन मुंबई उपनगरात आपला ठसा उमटवला आहे.

प्रयोग मालाड संस्था एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत प्रायोगिक नाटय-पर्व आयोजित करीत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्यात एक प्रायोगिक नाटक प्रयोग मालाड संस्थेतर्फे प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह येथे दाखविण्यात येईल. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या मुंबई/पुणे येथील सर्वोत्तम प्रायोगिक नाटकांची या नाटय-पर्वासाठी निवड केली जाईल.

या प्रायोगिक नाटय महोत्सवासाठी प्रेक्षक सभासद बनून दर महिन्याच्या एका शनिवारी किंवा रविवारी रात्रौ ८ वाजता प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, ४ था मजला, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०००९१ येथे आपल्याला एक प्रायोगिक नाटक पाहता येईल.

सभासदांना सर्व नाटकांसाठी एकत्र असणाऱ्या “वार्षिक सभासद ओळखपत्रा” चे वाटप ६, ७ व ८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत “प्रयोग मालाड” कार्यालय, नंदादीप, रिद्धी अपार्टमेंट, नानुभाई भुलेस्कर मार्ग, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४, येथे करण्यात येईल. या सभासदत्त्वावर वार्षिक सभासद ओळखपत्र दाखवून कोणत्याही एका व्यक्तीस नाट्य पर्वासाठी प्रवेश मिळेल.

रामकृष्ण गाडगीळ प्रायोगिक नाटय-पर्व उपक्रमाचा शुभारंभ रविवार दि. १४ एप्रिल २०२४ रोजी प्रथम प्रायोगिक नाटकाने होणार आहे.

आसन व्यवस्था:
  • पहिली रांग: फक्त निमंत्रितांसाठी राखीव.
  • दुसरी व तिसरी रांग: वरिष्ठ नागरिकांसाठी राखीव.
  • उर्वरित रांगा: “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्त्वावर मिळतील.

प्रेक्षक सभासद योजना

प्रति सभासद वार्षिक देणगी मूल्य — ₹२०००
(एकूण १२ प्रायोगिक नाटके)

× Need help?