स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धक संस्था नेहमीच ऊत्सुक असतात.
स्पर्धकांचे फोन येतच होते पण एक फोन असा अाला की अाम्ही एक क्षण भांबावून गेलो. तो फोन होता एका ज्येष्ठ नागरिक पती पत्नी चा. त्यांनी चक्क स्पर्धेला प्रेक्षक म्हणून येण्याची इच्छा दर्शविली.
प्रयोग मालाडच्या ३६ वर्षाच्या प्रवासात असा अनुभव प्रथमच येत होता. अामचा ऊत्साह दुणावला अाणि त्यांचे स्वागत करायला अाम्ही लगेचच तयार झालो.
ते ज्येष्ठ नागरिक पती पत्नी होते श्रीयुत नाखरे अाजोबा अाणि सौ नाखरे अाजी.