लेखक एक नाट्यछटा अनेक – एकांकिका स्पर्धोत्सव – २०१८
—
दूरदर्शन मालिकांच्या आजच्या या काळात, ८० च्या दशकातील गाजलेल्या एकांकिका नवीन रंगकर्मींना अभ्यासता याव्यात हा मुख्य उद्देश मनात ठेऊन प्रयोग मालाड – लेखक एक नाट्यछटा अनेक ही संकल्पना गेली चार वर्षे राबवीत आहे.
तत्कालीन लेखकांनी आपल्या विविधरंगी एकांकिकेतून हाताळलेले वेगवेगळे नाट्यप्रकार सादर करताना दिग्गज दिग्दर्शकांना एक आव्हान वाटत असे. हे आव्हानात्मक सादरीकरण वर्तमान पिढीतील दिग्दर्शकांना व कलाकारांना नवे प्रोत्साहन देईल. तसेच या “गाजलेल्या” एकांकिका नव्या संकल्पनेने सादर करण्याची प्रेरणा या पिढीला मिळेल.
एकांकिका स्पर्धेत विविध लेखकांच्या विविध एकांकिकेतील विविध नाट्यप्रकार सादर केले जातात. मग या “गाजलेल्या” एकांकिका एकाच लेखकाच्या का? तर या स्पर्धोत्सवात “एकाच लेखकाचे विविध नाट्यप्रकार – जसे की राजकीय, सामाजिक, कौटुंम्बिक, गूढ, निखळ विनोदी, प्रहसनात्मक, पौराणिक असे विविध नाट्यप्रकार” नाट्यकर्मींना सादर करता यावेत म्हणून.
उत्सवातील आनंद आणि स्पर्धेतील आव्हान, याचे एकत्रीकरण म्हणजेच स्पर्धोत्सव. स्पर्धोत्सवातील स्पर्धात्मक सादरीकरणामुळे प्रत्येक एकांकिकेचे मूल्य उंचावत जाईल. हा स्पर्धोत्सव अधिकाधिक दर्जेदार व्हावा यासाठी “सर्वांसाठी खुला” असून हौशी व व्यावसायिक नाट्यकर्मींना येथे निमंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे व्यावसायिक कलाकारांनाही कलाविष्काराचा पुनारानंद मिळेल.
यावर्षी श्री. जयंत पवार यांच्या निवडक नाट्यसंहिता सोडतीद्वारे स्पर्धक संस्थांना देण्यात येतील. सोडतीत मिळालेली नाट्यसंहिता स्पर्धक संस्थेने सादर करावयाची आहे.
जयंत पवार यांच्या एकांकिका
स्पर्धकांसाठी जयंत पवार लिखित एकांकिकांचा सारांश
नियमावली
लेखक एक नाट्यछटा अनेक २०१८ या स्पर्धोत्सवाची नियमावली वाचण्यासाठी / download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लेखक एक नाट्यछटा अनेक २०१८ नियमावली